searchicon
facebook twitter pinterest googleplus mail reddit

दोन विनोद वीरां मधील दोस्ती

published time By Liveinstyle published time 02 May, 2018 Share image 0 Shares

मॅकडॉवेल्स प्रस्तुत नं १ यारी विथ स्वप्नील पावर्ड बाय वियू अॅपच्या ९ व्या भागाची सुरूवात अतिशय वेगळ्या पध्दतीने होणार आहे.  या भागात दोन दिग्गज विनोदवीर व स्टॅन्ड अप कॉमेडीच्या माध्यमातून नावारूपाला आलेली जोडी व आपल्या आवाजाचे लोकांवर गारूड घालणारी सतत हसवणारी जोडी जॉनी लिव्हर आणि सुदेश भोसले आपल्यासमोर येणार आहेत.
जॉनी लिव्हरने आपल्या लहान पणापासून विनोदवीर होण्यासाठी केलेला संघर्ष व त्याचबरोबर दोस्तांचे महत्त्व हे या भागात आपल्याला पहायला मिळणार आहे.  सुदेश भोसले आणि जॉनी लिव्हर यांनी एकमेकांबरोबर घडलेले किस्से कसे विनोदी होते हे आपल्याला या भागात पहायला मिळणार आहेत.     

Play button
या शो मध्ये एकत्र आलेल्या या दोस्त आणि कलाकार असलेल्या या लोकांनी आपली अगदी खाजगी गुपिते तर शेअर केलीच पण त्याचबरोबर 'स्पीन दि व्हील','रॅपिड फायर' इत्यादी खेळांच्या माध्यमातून त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला आहे. 
नंबर १ यारी या शो च्या माध्यमातून प्रथमच मराठी स्टार्स आपल्या पडद्यावर मित्र तर आहेतच पण त्याचबरोबर ते आपल्या यारीचे बंध कसे जीवनात आहेत याची माहिती आपल्याला या शो मध्ये पहायला‍ मिळणार आहे.  
तर मग नवीन असा शो मॅकडॉवेल्स नं १ प्रस्तूत नं. १ यारी विथ स्वप्नील या टॉक शो ला कलर्स मराठी वर दर रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता तसेच वियू अॅपवर प‍हायला विसरू नका.