searchicon
facebook twitter pinterest googleplus mail reddit

गुरू शिष्यांमधील दोस्ती/यारी – आदरयुक्त भिती असणारा मित्र

published time By Liveinstyle published time 02 May, 2018 Share image 0 Shares


मॅकडॉवेल्स प्रस्तुत नं १ यारी विथ स्वप्नील पावर्ड बाय वियू अॅपच्या ८ व्या भागात आपल्या क्षेत्रात नाविन्य आणणारा कलाकार सतीश राजवाडे आणि तितकीच गोड अभिनेत्री मुक्ता बर्वे मैत्रीच्या त्यांच्या संकल्पना उलगडून सांगणार आहेत.  
आजच्या या नंबर १ यारी विथ स्वप्नीलच्या भागात दिग्दर्शक सतीश राजवाडे नंबर १ रॅगिंग विथ स्वप्नील असे का म्हणाला.  ते आपल्याला या भागात पहायला मिळणार आहे.  कोणत्या चित्रपटात काम करतांना मुक्ता आणि स्वप्नील ने कोणत्या प्रकारची मदत केली ज्यामुळे सतीश अतिशय भावूक झाला.  असे काय घडले की ज्यामुळे मुक्ता निःशब्द झाली.  

Play button
या शो मध्ये एकत्र आलेल्या या दोस्त आणि कलाकार असलेल्या या लोकांनी आपली अगदी खाजगी गुपिते तर शेअर केलीच पण त्याचबरोबर 'स्पीन दि व्हील','रॅपिड फायर' इत्यादी खेळांच्या माध्यमातून त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला आहे. 
नंबर १ यारी या शो च्या माध्यमातून प्रथमच मराठी स्टार्स आपल्या पडद्यावर मित्र तर आहेतच पण त्याचबरोबर ते आपल्या यारीचे बंध कसे जीवनात आहेत याची माहिती आपल्याला या शो मध्ये पहायला‍ मिळणार आहे.  
तर मग नवीन असा शो मॅकडॉवेल्स नं १ प्रस्तूत नं. १ यारी विथ स्वप्नील या टॉक शो ला कलर्स मराठी वर दर रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता तसेच वियू अॅपवर प‍हायला विसरू नका.