गायक संगीतकाराची कॉलेज मधील नंबर १ यारी

संगीत  क्षेत्रात कार्यरत असलेली आणखी एक जोडी मॅकडॉवेल्स नं  १ सोडा प्रस्तुत नं १ यारी विथ स्वप्नील या कार्यक्रमाच्या दुस-या भागात आपल्या भेटीला येत आहे.  
दुस-या भागात आपल्याला गायक संगीतकार अशी तरूणाईच्या गळ्यातील ताईत जोडी आपल्या भेटीला येत असून ही जोडी म्हणजे संगीतकार अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर. कॉलेज पासून ही जोडी एकमेकांचे चांगले मित्र तर आहेतच पण गायन तसेच संगीत क्षेत्रातही दोघांनी आपला अनोखा असा ठसा उमटवला आहे.  या भागात मावशी हे नामानिधान कोणाला मिळाले आहे याचा एक मजेदार किस्सा आपल्याला ऐकायला मिळणार तर आहेच पण त्याचबरोबर  त्यांनी कॉलेज मध्ये असतांना कशा प्रकारे यारी निभावली आहे याचीही माहिती आपल्याला या भागात मिळणार आहे.  केवळ एक संगीतकार नव्हे तर अवधूत गुप्तेला आणखी एक अनोखी कला अवगत आहे याचीही माहिती आपल्याला मिळेल.  
या शो मध्ये एकत्र आलेल्या या दोस्त आणि कलाकार असलेल्या या लोकांनी आपली अगदी खाजगी गुपिते तर शेअर केलीच पण त्याचबरोबर 'स्पीन दि व्हील','रॅपिड फायर' इत्यादी खेळांच्या माध्यमातून त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला आहे. 
या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी मॅकडॉवेल्स नं १ प्रस्तूत नं. १ यारी विथ स्वप्नील या टॉक शो ला कलर्स मराठी वर दर रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता तसेच वियू अॅपवर प‍हायला विसरू नका. 

 

Interested in more such stories? Subscribe to LiveInStyle.com

  •